[VIDEO] यासाठी झरीन खानला ख्रिसमस सण खूप आवडतो

अभिनेत्री झरीन खानसाठी ख्रिसमसचा दिवस खूप खास आहे. बॉलिवूड या अभिनेत्रीने एका मुलाखतीत याविषयी तिच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

zareen khan
[VIDEO] यासाठी झरीन खानला ख्रिसमस सण खूप आवडतो  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानबरोबर बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी आणि तिच्या मोहक अदांनी सोशल मीडियावर अनेकांना घायाळ करणारी झरीन खानने फॅमिना फाँट सलूनमधील एका मुलाखतीच्या वेळी ख्रिसमसच्या तयारीवर बरीच चर्चा केली. झरीन ख्रिसमसविषयी खूप उत्सुक आहे. याविषीय ती म्हणाली की, 'ख्रिसमस हा सण लहानपणापासूनच तिच्यासाठी आवडता सण राहिला आहे.'

ती अधीरतेने या दिवसाची वाट पाहते. झरीनने विनोदपणे म्हटले की, तिला तिच्या लूकचा खूप अभिमान आहे. कारण यामुळे तिला शाळेत दहावी इयत्तेत सांताक्लॉज बनण्याची संधी मिळाली होती. म्हणून तिच्यासाठी हे आणखी विशेष आहे. अभिनेत्री म्हणाली की, तिला ख्रिसमसच्या दिवशी केकपासून सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री आणि सांताच्या कथा सर्वकाही आवडते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी