Bollywood actor इरफान खानच्या निधनानंतर ढसाढसा रडला कॉमेडियन सुनील पाल, WATCH VIDEO

Comedian Sunil Pal on Irfan Khan's death: अभिनेता इरफान खान यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनाने कॉमेडियन सुनील पाल ढसाढसा रडला. 

comedian sunil pal wept bitterly after irfan khans death watch video entertainment news in marathi
ढसाढसा रडला कॉमेडियन सुनील पाल, WATCH VIDEO 

थोडं पण कामाचं

  • बॉलिवूडचा अभिनेता आज निधन झाले 
  • ५३ वर्षीय इरफानने मुंबईत घेतला अखेरचा श्वास 
  • अभिनेता इरफान खान यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा 

मुंबई :  अभिनेता इरफान खान यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर कॉमेडियन सुनील पाल याला अतीव दुःख झाले असून त्याला आपले अश्रू अनावर झाले. त्याने आपली श्रद्धांजली व्यक्त करताना म्हटले की मी असा व्यक्ती पाहिला नाही. तो कायम आत्मविश्वास वाढत होतो. मला विश्वास नाही वाटत की ते आता या जगात नाही आहे. त्यांच्या मृत्यूवर विश्वास ठेवणे कठीण आहे. 

बॉलिवूडचा कसदार अभिनेता इरफान खान याने बुधवारी अखेरचा श्वास घेतला. थिएटरपासून सिनेमापर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडलेल्या इरफान खान याचे मुंबईच्या कोकीलाबेन रुग्णालयात निधन झाले. तो केवळ ५३ वर्षांचा होता. 

 सलाम बॉम्बे चित्रपटातून पदार्पण 
 
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामतून अभिनयाचा धडे घेतल्या इरफान खान याने १९८८ मध्ये सलाम बॉम्बे या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर कमला की मौत, दृष्टी, एक डॉक्टर की मौत, वादे इरादे, घात, फुटपाथ, धुंध, आन, चेहरा सारखे चित्रपट केले होते. २०११ मध्ये भारत सरकारने त्याला पद्मश्री पुरस्काराने स्मानित करण्यात आले होते. ६० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१२ मध्ये इरफान खान यांना चित्रपट पानसिंह तोमरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देण्यात आला होता. 

अखेरचा चित्रपट अंग्रेजी मीडियम 

इरफान खान अखेर अंग्रेजी मीडियममध्ये दिसले होते. या चित्रपटात करीना कपूर आणि राधिका मदान लीड रोलमध्ये दिसले. या पूर्वी तो २०१८ मध्ये कारवाँ आणि ब्लॅकमेल दिसला होते. याच काळात त्याला न्युरो एंडोक्राइन ट्यूमरचा इलाज करण्यासाठी ते परदेशात गेले होते.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी