शिवसेनेचा आरोप- सुशांत सिंह प्रकरणी चित्रपटसृष्टीला बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे

बी टाऊन
Updated Sep 25, 2020 | 11:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Drug case: ड्रग्स प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशची चौकशी करून आज एनसीबी त्यांची साक्ष नोंदवणार आहे.

Sanjay Raut and Sushant Singh Rajput
शिवसेनेचा आरोप- सुशांत सिंह प्रकरणी चित्रपटसृष्टीला बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • सुशांत सिंह प्रकरणात ड्रग्सच्या संबंधांची जोरात चौकशी करत आहे एनसीबी
  • सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ड्रग्स प्रकरणी अद्याप न्यायलयीन कोठडीत
  • आज एनसीबी नोंदवणार बॉलिवुडमधील महत्वपूर्ण सेलेब्रिटीजची साक्ष

मुंबई: शिवसेनेने (Shivsena) आरोप केला आहे की नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (Narcotics Control Bureau) (एनसीबी) तपासाद्वारे मुंबईच्या (Mumbai) चित्रपटसृष्टीला बदनाम (defaming film industry) करण्याचे कारस्थान (conspiracy) सुरू आहे. शिवसेनेचे मुखपत्र (Shivsena mouthpiece) ‘सामना’च्या (Saamna) संपादकीयातून (editorial) शिवसेनेने अप्रत्यक्षपणे भाजपावर (BJP) निशाणा साधत म्हटले आहे की चित्रपटसृष्टीच्या आडून मुंबई आणि महाराष्ट्रावर निशाणा साधला जात आहे.

‘सामना’मधून शिवसेनेचा हल्लाबोल

शिवसेनेने याआधीही ‘सामना’मधून सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणातत महाराष्ट्र सरकारचा बचाव आणि अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर बीएमसीने केलेल्या कारवाईचे समर्थन केले आहे. या संपादकीयात म्हटले गेले आहे की मुंबईतील चित्रपटसृष्टी मुंबईच्या बाहेर नेण्याचेही प्रयत्न केले जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात नवी फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांच्या सरकारने मास्टर प्लॅनही जाहीर केला आहे.

एनसीबीसाठी महत्वाचा दिवस

ड्रग्स प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशची चौकशी करून आज एनसीबी त्यांची साक्ष नोंदवणार आहे. तर २६ सप्टेंबर रोजी एनसीबीकडून दीपिका पादुकोणची चौकशी केली जाणार आहे. यासाठी दीपिका गोव्याहून मुंबईला पोहोचली आहे. एका व्हॉट्सअॅप चॅटमध्ये तिने ड्रग्सचा उल्लेख केल्याचे समोर आले आहे.

चित्रपटसृष्टीचा ड्रग्सशी जोडला जात आहे अनावश्यक संबंध

‘सामना’मधील संपादकीयात असेही म्हटले गेले आहे की संपूर्ण चित्रपटसृष्टी जणू गर्द आणि अफूच्या आहारी गेली आहे असे चित्र हेतुपुरस्सर निर्माण केले जात आहे. या अग्रलेखात पंतप्रधान मोदींवरही थेट निशाणा साधला आहे. सलमान खान आणि अक्षय कुमारसारख्या अभिनेत्यांसोबत मोदींनी ज्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता त्यांचा उल्लेख करून ‘सामना’ने म्हटले आहे की याच चित्रपटसृष्टीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेतला गेला आहे. तसेच अनुपम खेर यांच्या ‘दि अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ आणि विवेक ओबेरॉयच्या नरेंद्र मोदींवरील चित्रपटांवरही यात हल्लाबोल करण्यात आला आहे. योगी सरकारची फिल्मसिटी उभारण्याची योजना चांगली असली तरी ती चालवणे अवघड असल्याची कोपरखळीही ‘सामना’मधील संपादकीयात मारली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी