[VIDEO] दीपिका पदुकोण झाली भावुक, पाहा काय आहे कारण

बी टाऊन
Updated Oct 08, 2019 | 18:05 IST

आगमी सिनेमा 83 चं शूटिंग संपताच दीपिका पादुकोण भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यासाठी तिने सिनेमाच्या टीमलाच एक खास पत्र लिहलं आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने नुकतंच '83' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. ज्यामध्ये तिच्यासोबत तिचा पती रणवीर सिंह हाच मुख्य भूमिकेत असणार आहे. या सिनेमाचं शूटिंग संपल्यानंतर दीपिका खूपच भावुक झाल्याचं दिसून आली. यामुळेच तिने 83 सिनेमाच्या टीममधील सर्व मेंबर्संना एक खूप सुंदर पत्र लिहलं आहे. ज्यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, मागील काही महिने या सिनेमाचं शूटिंग दरम्यानचे क्षण खूपच चांगले होते. काही जुन्या आठवणी देखील ताज्या झाल्या आणि या सिनेमाचा मी एक भाग असल्याने मला खूप आनंद देखील झाला. 

यामुळेच मी तुम्हा सगळ्यांना सिनेमाचं शूटिंग संपल्यानंतर पार्टीसाठी निमंत्रण देत आहे. दीपिका या सिनेमात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच दीपवीर म्हणजेच दीपक आणि रणवीर हे सिनेमात एकत्र दिसणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...