Deepika Padukone Kangana Ranaut to Akshay Kumar stars who share TRAUMATIZING incident from their childhood : बॉलिवूडच्या निवडक कलाकारांच्या बाबतीत बालपणी वाईट घटना घडल्या आहेत. या घटनांच्या आठवणीने या कलाकारांना आजही दुःख होते. आज बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेल्या अनेक कलाकारांचे बालपणीच्या आयुष्यात किमान एकदा लैंगिक शोषण झाले होते.
कंगना राणावतने लॉकअप या रिअॅलिटी शो मध्ये वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांची माहिती दिली. यावेळी बालपणी एका मुलाने कसे चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता हे कंगनाने सांगितले. याआधी दीपिकानेही स्वतःच्या बालपणीचा एक वाईट अनुभव जगजाहीर केला होता.
सोनम कपूरने १३ वर्षांची लैंगिक शोषण झाल्याचे सांगितले. एका मुलाखतीत सोनम म्हणाली की ती सिनेमा बघायला गेली होतील. थिएटरमध्ये शेजारी बसलेल्या मुलाने सोनमला वाईट वागणूक दिली. बॉलिवूड 'खिलाडी' अक्षय कुमार यालाही बालपणी वाईट अनुभव आला होता.
नीना गुप्ता पण लैंगिक शोषणाची बळ ठरली आहे. नीनाने तिच्या 'सच कहूं तो' या पुस्तकातून शोषणाची माहिती जगजाहीर केली. डोळ्यांच्या डॉक्टरकडे उपचारासाठी गेली होती त्यावेळी डॉक्टरने भावाला केबिनबाहेर बसवून तिच्यासोबत वाईट वर्तन केले होते. तसेच शिंप्याकडे कपडे शिवायला जायची त्यावेळी तिथेही अशीच वाईट वागणूक मिळायची असे नीना गुप्ताने पुस्तकात नमूद केले आहे.