'८३' सिनेमाबाबत अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने केला मोठा खुलासा

बी टाऊन
Updated Sep 21, 2019 | 22:23 IST | टाइम्स नाऊ हिंदी

बॉलिवूडचा अभिनेता 'रणवीर सिंग' '८३' मध्ये कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे तर दीपिकाने कपिल देवच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका करण्यामागचं कारण दीपिकाने सांगितलं आहे.

Entertainment news of ranveer singh and deepike padukon news at mumbai in maharashtra
चित्रपट '८३' मध्ये रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणची जोडी  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • रणवीर सिंग 'कपिल देव'च्या भूमिकेत
  • दीपिकाने सांगितलं खेळाडूंच्या परिवाराचं महत्त्व
  • मुख्य भूमिकेसाठी रणवीर सिंग घेतोय प्रचंड मेहनत

मुंबई: बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंग '८३' सिनेमात भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. १९८३ मध्ये भारताने क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता त्यावर आधारीत ८३ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताचे माजी कप्तान कपिल देव यांनी भारताला १९८३ मध्ये वर्ल्ड कप जिंकून दिला. कपिल देव यांच्या भूमिकेसाठी रणवीर सिंग खूप मेहनत घेताना दिसतोय. त्याने कपिल देव सोबत घालवलेल्या काही क्षणांचा फोटोज  इन्स्टाग्रामवर शेअर केले  आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका निवडण्यामागचं कारण दीपिकाने सांगितलं आहे.

दीपिकाने म्हटलं की "प्रत्येक आंतरराष्ट्रीय खेळाडूला त्यांच्या नावाने आणि उत्कृष्ट खेळामुळे त्यांना नेहमी ओळखले जाते पण त्यामागे त्यांना सतत पाठींबा देणाऱ्या कुटूंबातील सदस्यांची माहिती किंवा नाव पुढे येत नाही, त्यासाठी मी ही भूमिका करण्यास तयार झाली आहे. जेणेकरुन प्रेक्षकांना कपिल देव यांच्या पत्नीच्या बाबतही कळेल. '८३' हा सिनेमा १० एप्रिल २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

 

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी