[VIDEO] सलमानच्या 'राधे'मध्ये असा असेल दिशाचा रोल! 

बी टाऊन
Updated Nov 04, 2019 | 23:58 IST

२०२० मध्ये ईदच्या मुहूर्तावर 'राधे' हा सिनेमा रिलीज होणार आहे. ज्यामध्ये दिशा पटानी देखील दिसणार आहे.

मुंबई: बॉलिवूडचा दंबग सलमान खानने नुकतंच सोशल मीडियावर राधे सिनेमाच्या सेटवरुन एक पोस्ट टाकली आहे. ज्यामध्ये जॅकी श्रॉफ सोहेल खान आमि दिशा पटानी देखील पाहायला मिळत आहे. ज्यानंतर ही गोष्ट निश्चित झाली की, सलमानचा आगामी सिनेमा 'राधे'मध्ये दिशाच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राधेमध्ये दिशा प्रमुख भूमिकेत असली तरी ती फार मोठी भूमिका साकारणार नाही. कारण हा एक अॅक्शन सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमात दिशाच्या वाट्याला फार काही येणार नाही.

दिशासाठी हा सिनेमा खूप खास ठरणार आहे. कारण की, ईदच्या मुहूर्तावर सलामनसह येणारा हा सिनेमा तिच्यासाठी मैलाचा दगड ठरु शकतो. दिशाने सलमानचा सिनेमा 'भारत' मध्ये देखील कॅमियोचा रोल प्ले केला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...