[VIDEO] दिशा पटानीचे हे फोटो होतायेत व्हायरल 

बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेते आणि अभिनेत्रींच्या यादीमध्ये टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचा समावेश आहे. पाहा त्यांचा हाच खास व्हिडिओ  

Disha Patani
[VIDEO] दिशा पटानीचे हे फोटो होतायेत व्हायरल  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी अलीकडे मालदीवमध्ये एकत्र वेळ घालवला आहे. यादरम्यान हे दोघेही सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह होते आणि त्यांचे फोटो शेअर करत होते, यामुळे ते बरेच चर्चेत होते. त्यांच्या बोल्ड स्टाईलबरोबरच त्याच्या फिटनेसबाबतही बरीच चर्चा झाली.  फिटनेससाठी दोघेही खूप मेहनत घेतात. म्हणूनच त्यांना फिटनेस फ्रीक्स असे म्हटले जाते. हे त्यांच्या फोटोवरुन स्पष्ट झाले आहे. 

दिशा आणि टायगर बर्‍याच दिवसांपासून एकत्र होते आणि बर्‍याचदा एकत्र वेळ घालवताना दिसतात पण अद्याप त्यांनी त्यांचे नाते स्वीकारलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्ष साजरा करण्यासाठी दोघेही आता कुठेतरी दुसर्‍या ठिकाणी जाण्याच्या विचारात आहेत. हे दोघे आपले नवीन वर्ष कोठे आणि कसे साजरे करतात हे आता पाहिले जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी