[VIDEO]सिनेमातील भूमिकेबाबत, इम्रान हाश्मीचा मोठा खुलासा...

बी टाऊन
Updated Nov 27, 2019 | 19:11 IST

अभिनेता इम्रान हाश्मीने आपल्या करिअर आणि जीवनाशी संबंधीत काही गोष्टी झूमच्या मुलाखतीत सांगितल्या आहेत.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीचा 'द बॉडी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात इम्रान हाश्मी व्यतिरिक्त अभिनेता ऋषी कपूर या सिनेमात दिसणार आहे. तसंच 'द बॉडी' या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. या ट्रेलरमध्ये इम्रान हाश्मी आणि ऋषी कपूरचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला आणि हा ट्रेलर खूप सस्पेन्स आहे. त्यामुळे सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र इम्रानने आपल्या करिअर आणि जीवनाशी संबंधीत काही गोष्टी झूमच्या मुलाखतीत सांगितल्या आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, इम्रान हाश्मीने सुपरस्टार ऋषी कपूर यांच्याशी सिनेमात काम केलं आहे. त्यामुळे त्यांचा सच्चेपणा आणि प्रामाणिकपणा इम्रानने सांगितला. तसंच इम्रानने सांगितलं की, जेव्हा एखाद्या अभिनेत्याला सिनेमात भरपूर काम करून सुद्धा अपयश मिळतो, तेव्हा त्याच्या मनाला किती वेदना होत असतील. मी कधीही कॉमेडी सिनेमात काम केलं नाही. त्यामुळे आता मला कॉमेडी सिनेमात काम करायचं आहे.

 

 

'द बॉडी' या सिनेमाचे दिग्दर्शक जीतू जोसेफ आहेत. अभिनेता ऋषी कपूर व्यतिरिक्त इम्रान हाश्मी, सोभिता धुलिपला आणि वेदिका या सिनेमात दिसणार आहेत. सोभिता धुलिपला आणि वेदिका  या सिनेमातून मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसंच हा सिनेमा १३ डिसेंबर २०१९ ला रिलीज होणार आहे.

द बॉडी या सिनेमानंतर इम्रान हाश्मीचा 'चेहरे' हा अपकमिंग सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चेहरे या सिनेमात इम्रान हाश्मी ,सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा कोर्ट ड्रामावार आधारित असल्यामुळे, इम्रान या सिनेमात मुख्य भूमिकेतून दिसणार आहे.

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी