[VIDEO] हाऊसफुल 4 या सिनेमाचं नवं गाणं रिलीज, पहा त्याची एक झलक

बी टाऊन
Updated Oct 16, 2019 | 16:52 IST

'हाऊसफुल ४' या चित्रपटाचं 'द भूत सॉन्ग' प्रदर्शित झालं आहे. या गाण्यातून नवाजुद्दीन सिद्दिकीची भूमिका खूप हास्यासपद आहे. तो अक्षय कुमारच्या अंगात संचारलेला भूत बाहेर काढत आहे.

मुंबई : 'शैतान साला' या धमाल गाण्यानंतर 'हाऊसफुल ४' या चित्रपटाचं दुसरं गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचं टायटल 'द भूत सॉन्ग' आहे. या गाण्यात अभिनेता 'नवाजुद्दीन सिद्दिकी' हा एका साधू बाबाच्या भूमिकेत दिसत आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या अंगात भूत संचारल्यामुळे नवाजुद्दीन त्या भूताला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, अक्षयच्या भूताला अंगातून काढण्यासाठी तो "आलिया भट्ट" या मंत्राचा वापर करत आहे. बॉलिवूडचा पार्श्वगायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिका सिंगने आपल्या नव्या अंदाजात आणि मनाला खदखदुन हसवण्यासारखं हे गाणं गायलं आहे.

'हाऊसफुल ४' एका मल्टी-पीरियड ड्रामावर आधारीत आहे. या  चित्रपटातील कलाकारांना आपण ६०० वर्षांपूर्वी पुनर्जन्म झालेल्या भूमिकेत पाहणार आहोत. तसेच या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त रितेश देशमुख, कृती सनॉन , पूजा हेगडे , बॉबी देओल, कीर्ति खरबंदा, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, बोमन ईरानी, आणि राणा डग्गुबती मुख्य भूमिकेत दिसतील.

'हाऊसफुल ४' हा पहिल्या चित्रपटाचा चौथा इन्स्टॉलमेंट आहे. त्यामध्ये भरपूर कॉमेडी आणि प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक फरहाद आणि निर्माता साजिद नाडियाडवाला आहे. 'हाऊसफुल ४' यंदाच्या दिवाळीला २६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांकडून, या चित्रपटाला सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

 

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी