[VIDEO] मलायका अरोरानं केला अभिनेता अर्जुन कपूरबाबत मोठा खुलासा

बी टाऊन
Updated Nov 06, 2019 | 18:36 IST | Zoom

 मलायका आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशिपबाबत चर्चा बॉलीवुडमध्ये रंगत आहे. त्यामुळे हे दोघं लग्नाच्या बंधनात कधी अडकणार, याविषयी 'झूम'ने मलायकाची मुलाखत घेतली.

Entertainment news arjun kapoor and malaika arora wedding interview the news in marathi google batmya
[VIDEO] मलायका अरोरानं केला, अभिनेता अर्जुन कपूरबाबत मोठा खुलासा  |  फोटो सौजन्य: YouTube

मुंबई : बॉलीवूड स्टार अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाबाबत काही गोष्टी समोर आल्या आहेत. या दोघांचं एकत्र राहणं, सोशल मीडियावरील एकमेकांच्या फोटोला कमेंट करणं आणि विशेषत: पब्लिकच्या समोर येणं. या सर्व गोष्टी या व्हिडिओतून दिसत आहेत. तसेच अर्जुन आणि मलायका लग्न कधी करणार? असे प्रश्न उपस्थित होतात. आण त्या संदर्भात तारखांच्या अफवा पसरत होत्या. त्यामुळे झूमने यासंदर्भात  मलायकाची मुलाखत घेतली असता, तीनं आपल्या लग्नाची तारीख आणि स्थळ याविषयी काहीच माहिती दिलेली नाही. मात्र हे दोघं बीचवरती लग्न करणारं आहेत असं मलाइकानं सांगितलं.

अर्जुन कपूरबाबत मलाइकानं सांगितलं की, आम्ही दोघं एकमेकांसाठी परफेक्ट आहोत. मात्र, अर्जुन एक चांगला फोटोग्राफर आहे. त्याच्या मते मी अत्यंत वाईट फोटोग्राफर आहे.  तो पैशांची फार उधळपट्टी करतो हे मला आवडत नाही. पैसे कशापद्धतीने सांभाळून ठेवावे हे त्याने शिकले पाहिजे. पण अर्जुन या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या जोडीची बॉलीवुडमध्ये नेहमी चर्चा असते, त्यांच्याबाबत अनेक गोष्टी बोलल्या जातात.  त्यामुळे हे दोघं टॉप कपल म्हणून प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यामुळे या दोघांचं लग्न निश्चितचं होणार असं समजलं जातयं. तसेच त्यांच्या चाहत्यांनाही लग्नाबाबत भरपूर उत्सुकता आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी