[VIDEO] 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत दिसणार, मोहसीन खानचा नवं लूक

बी टाऊन
Updated Nov 06, 2019 | 18:05 IST | Zoom

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील अभिनेता मोहसीन खानचं नवं लूक पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून मोहसीन सरदारची भूमिका करणार आहे. त्याचसंदर्भात त्यानं झूमशी संवाद साधला.

Entertainment news of mohsin khan sardar look in yeh rishta kya kehlata tv serial the news in marathi google batmya
[VIDEO] 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत दिसणार, मोहसीन खानचं नवं लूक  |  फोटो सौजन्य: YouTube

मुंबई : टीव्ही स्टार मोहसीन खानचा 'ये रिश्ता क्या कहलाता है' या हिंदी मालिकेत नवं लूक पाहायला मिळणार आहे. या मालिकेत त्याचं नाव कार्तिक असं आहे. आता कार्तिक एका पंजाबी सरदारची भूमिका करताना दिसणार आहे. या लूकमध्ये तो एक पंजाबी मुंडा म्हणून दिसणार आहे. त्याचसंदर्भात 'झूम'ने त्याची मुलाखत घेतली. 

मोहसीन उर्फ कार्तिकने सांगितलं की, मी ड्रीम गर्ल या मालिकेतसुद्धा सरदार बनलो होतो. त्यामुळे मला खूप आनंद झाला होता. आता माझा गेटअप थोडसा आगळवेगळा आहे. पंजाबी भाषेचासुद्धा चांगला अनुभव मिळत आहे. मला काहीतरी वेगळं आणि आव्हानात्मक करायला आवडतं. त्यामुळे आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात. 
 
'प्यार तुने क्या किया, ड्रीम गर्ल आणि निशा और उसके कझिन्स या मालिकेत सुद्धा मोहसीननं आगळ्या-वेगळया भूमिका केल्या होत्या. त्यामुळे त्याच्या अभिनयला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच 'नच बलिये ९' हा कार्यक्रम संपन्न झाला. शांतनु आणि नित्यामी या टॉप ५ जोड्यांबाबत कंट्रोवर्सी अजून चालू आहे. त्यामुळे 'झूम'ने यासंदर्भात दोघांचीही मुलाखत घेतली. 

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी