गळ्यात अजगर घेऊन पोज दिलीय या टीव्ही अभिनेत्रीनं, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Jun 30, 2022 | 15:09 IST

Erica Fernandes Python Video: एरिका फर्नांडिस सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. एरिकानं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Erica Fernandes
एरिका फर्नांडिसने गळ्यात अजगर घालून पोज दिली  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • एरिका फर्नांडिस सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.
  • एरिकानं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
  • एरिकानं हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.

मुंबई: Erica Fernandes Python Video: टीव्ही मालिका कसौटी जिंदगी की 2 ची अभिनेत्री एरिका फर्नांडिस सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह  असते. एरिकानं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती एका अजगरासोबत खेळताना दिसत आहे. एरिकानं हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. 

या व्हिडिओमध्ये एरिका तिच्या गळ्यात अजगर घेऊन पोज देताना दिसत आहे. एरिकानं हा व्हि़डिओ शेअर करत म्हटलं की, माझ्या नवीन मित्र पायथनला भेट. यानंतर ती कॅमेऱ्यासमोरच तिच्या गळ्यात असलेल्या अजगराला सगळ्यांनी हाय म्हणा; असं सांगत आहे. 

अधिक वाचा- Sanjay Raut : शिंदे गटाला फडणवीसांची धुणी भांडी करावी लागणार, संजय राऊत यांची टीका

व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये एरिका फर्नांडिस लिहितं, 'ब्युटी अँड द बीस्ट. आता तुम्हाला कळेल की सौंदर्य कोण आहे आणि बीस्ट कोण आहे. एरिकाच्या व्हिडिओमध्ये चाहते कमेंट करत आहेत की तिचा पुढचा शो नागिन किंवा खतरों के खिलाडी असू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी