Exclusive:  अंकिता लोखंडेने उघडले गुपीत, सुशांत सिंह राजपूत कधीच बोलला नाही रिया चक्रवर्तीबाबत

Ankita Lokhande on Sushant Singh Rajput:  सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या दीड महिन्यानंतर त्याची माजी एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने सर्व दाव्यांवर उत्तर दिले आहे. अंकिताने सांगितले की, ती नंतर कधीच सुशांतच्य

 exclusive sushant singh rajput ex girlfriend ankita lokhande
Exclusive:  अंकिता लोखंडेने उघडले गुपीत  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  •  सुशांत सिंह राजपूत निधनानंतर दीड महिन्यानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने आता आपली मौन सोडले आहे.
  • अंकिता लोखंडेने सांगितले की ब्रेकअपनंतर ती आणि सुशांत कधीच टचमध्ये नव्हतो.
  • Times Now च्या ग्रुप एडिटर नविका कुमार यांच्याशी बोलताना अभिनेत्री अंकिता लोखंडे बोलत होती.

मुंबई :  सुशांत सिंह राजपूत निधनानंतर दीड महिन्यानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने आता आपली मौन सोडले आहे. अंकिता लोखंडेने सांगितले की ब्रेकअपनंतर ती आणि सुशांत कधीच टचमध्ये नव्हतो. त्या शिवाय सुशांतने रियाबाबत कधीही काहीच सांगितले नाही. 

Times Now च्या ग्रुप एडिटर नविका कुमार यांच्याशी बोलताना अभिनेत्री अंकिता लोखंडे म्हणाली, माझे आणि आणि सुशांतचे चार वर्षांपूर्वी ब्रेकअप झाला होता. त्यानंतर आमच्या दोघांकडे एकमेकांचे नंबर नव्हते. 

अंकिता लोखंडेनुसार, आमची केवळ एकदा डायरेक्टर मुकेश छाबडाच्या माध्यमातून बातचित झाली होती. जेव्हा त्याचा एक चित्रपट रिलीज होणार होता. मीडियामध्ये ज्या काही बातम्या येत आहे की मणिकर्णिका या चित्रपटावेळी त्याने माझ्यासोबत रिया चक्रवर्तीबाबत काही बोलला होता हे सर्व खोटं आहे. 

गेल्या एक वर्षांपासून बदलला होता. 

अंकिताने सांगितले की, रिया चक्रवर्तीला मी ओळखत नाही. मी रियाचा एक इंटरव्ह्यू वाचत होती. त्यात ती म्हणते की ती सुशांतसोबत गेल्या आठ वर्षांपासून एकत्र आहोत. चार वर्षांपूर्वी तो माझ्यासोबत होता. ती कधी म्हणते आम्ही रिलेशनशीपमध्ये नव्हतो आता ती म्हणते की आम्ही रिलेशनशीपमध्ये होतो. 


अंकिता लोखंडेने सांगितले की गेल्या एक वर्षांपासून सुशांत सिंह खूप बदलला आहे. तो कमी दिसू लागला होता. मी त्याचा खास मित्र महेश शेट्टी याच्याशी बोलले होते. त्याने सांगितले होते की सुशांत बिल्कुल ठीक आहे. 


सुसाइड किंवा मर्डरवर बोलली अंकिता 

अंकिता विचारण्यात आले की सुशांतने आत्महत्या केली की त्याचे मर्डर झाला. या संदर्भात अंकिता लोखंडे यांनी सांगितले, मी हे सांगू शकत नाही की  ही हत्या आहे की आत्महत्या पण असा कोणी आहे ज्याला खरं माहिती आहे की सुशांतने  असे का केले आहे. 

अंकिता लोखंडेनुसार, सुशांत इतका कमजोर कधी नव्हता. इतक्या छोट्या कारणामुळे सुशांत सुसाइड करू शकत नाही. यामागे खूप मोठे कारण असेल. मला नाही माहिती की गेल्या चार वर्षांपासून सुशांत कोणत्या परिस्थितीतून जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी