एनसीबीने रियाला विचारले 'हे' ५५ प्रश्न

Questions Asked to Rhea Chakraborty by the NCB अंमली पदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्तीला ५५ प्रश्न विचारले. टाइम्स नाऊच्या हाती हे प्रश्न आले आहेत.

Questions Asked to Rhea Chakraborty by the NCB
एनसीबीने रियाला विचारले 'हे' ५५ प्रश्न 

थोडं पण कामाचं

  • एनसीबीने रियाला विचारले 'हे' ५५ प्रश्न
  • रियाने एनसीबीला दिली २० पानांची साक्ष
  • रियाने अंमली पदार्थ प्रकरणात बॉलिवूडच्या २५ जणांची नावं घेतली

मुंबईः अंमली पदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau - NCB) रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला ५५ प्रश्न विचारले. टाइम्स नाऊच्या (Times Now) हाती हे प्रश्न आले आहेत. या प्रश्नांद्वारे एनसीबीने रियाची कसून चौकशी केली. रियाला विचारलेल्या प्रश्नांविषयीचे हे एक्सक्ल्युजिव्ह (Exclusive) वृत्त. (times now accesses the full details of the questions asked to rhea chakraborty by the ncb 55 questions)

रियाने एनसीबीला दिली २० पानांची साक्ष

एनसीबीने रियाला अंमली पदार्थ कोण कोण घेत होते, त्यासाठी कुठून पैसे आणले आणि कसे खर्च केले, सुशांतसोबतची रियाची युरोप टूर, किती आणि कशा स्वरुपाच्या पार्ट्या झाल्या, सुशांतचे सर्व पासवर्ड असे ५५ प्रश्न विचारले. एनसीबीच्या प्रश्नांना रियाने दिलेल्या उत्तरांचे संकलन म्हणजे २० पानांची साक्ष. रियाने दिलेली माहिती या २० पानांत नोंदवण्यात आली. रिया चक्रवर्तीची या साक्षीवर सही आहे. याच साक्षीत रियाने अंमली पदार्थ प्रकरणात बॉलिवूडच्या २५ जणांची नावं घेतली आहेत. यात अभिनेत्री सारा अली खान (sara ali khan) आणि अभिनेत्री रकुलप्रीत सिंग (rakulpreet singh) यांचा समावेश आहे. तसेच  डिझायनर (designer) सिमोन खंबाटाचे (simone khambatta) नाव रियाने एनसीबीला सांगितले.  लवकरच या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे. सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग या दोघींना एनसीबीकडून समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे.

एनसीबीने विचारले तीन पानांवर नमूद ५५ प्रश्न

एनसीबीने प्रश्न विचारण्याआधी पूर्ण तयारी केली होती. अधिकाऱ्यांकडे ३ पानांचा दस्तऐवज (Document) होता. यात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आधीपासूनच ५५ प्रश्न नोंदवून ठेवले होते. हे प्रश्न विचारायचे आणि आवश्यकता भासली तर उपप्रश्न विचारण्याची तयारी अधिकाऱ्यांनी करुन ठेवली होती. एनसीबीच्या दस्तऐवजातील पहिल्या पानावरच २२ प्रश्न होते. यातील पहिला मोठा प्रश्न होता. 'रिया चक्रवर्ती स्वतःविषयी तसेच स्वतःच्या कुटुंबाविषयी माहिती द्या, स्वतःचा मोबाइल नंबर काय आहे ते सांगा, हा मोबाइल नंबर कधी पासून आपण वापरत आहात ते सांगा तसेच जैद विलात्रा याला ओळखत असाल तर त्याबाबत विस्तृत माहिती द्या आणि अब्दुल बासित परिहार याला ओळखत असल्यास त्याच्याविषयी सविस्तर माहिती द्या'; अशा स्वरुपाचा पहिला मोठा प्रश्न होता. या प्रश्नाद्वारे थेट रियाची चौकशी सुरू झाली. 

तिथे अंमली पदार्थांचे सेवन व्हायचे का आणि अंमली पदार्थ कोण पुरवत होते?

रियाला विचारण्यात आले पावना येथील सुशांतच्या बंगल्यावर केलेल्या ट्रिपविषयी माहिती द्या, तिथे अंमली पदार्थांचे सेवन व्हायचे का आणि अंमली पदार्थ कोण पुरवत होते? सॅम्युअल मिरांडा आणि रिया अशी पहिली भेट नेमकी कधी झाली या भेटीचे कारण काय होते, असेही विचारण्यात आले.

रियाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सुशांतवर अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप केला होता. या मुद्यावर रियाला प्रश्न विचारण्यात आला. सुशांत अंमली पदार्थांचे सेवन करत होता का, जर याचे उत्तर हो असेल तर त्याच्यासाठी अंमली पदार्थ कोण आणायचे, सुशांतकरिता अंमली पदार्थांची व्यवस्था करणाऱ्यांमध्ये सहभागी होतीस का, असेही रियाला विचारण्यात आले. रियाने एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिले की लगेच उपप्रश्न विचारुन आणखी माहिती मिळवली जात होती. 

एनडीपीएस कायदा

जगभर विशिष्ट औषधांसाठी संबंधित देशातील सरकारच्या लेखी परवानगीने मर्यादीत प्रमाणात विशिष्ट अंमली पदार्थांचा वापर होतो. मात्र ही परवानगी नसताना कोणताही अंमली पदार्थ बाळगणे, त्याची वाहतूक करणे, अंमली पदार्थाची खरेदी अथवा विक्री करणे किंवा अंमली पदार्थांची वाहतूक आणि खरेदी-विक्री यापैकी किमान एका बाबतीत समन्वय करणे हा गुन्हा आहे. भारतात अंमली पदार्थ प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act - NDPS Act) दोषी आढळल्यास शिक्षा होऊ शकते. एनसीबीने चौकशीअंती रियाला एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक केली आहे. सध्या ती न्यायालयीन कोठडीत मुंबईच्या भायखळा येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहे. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतच्या घराचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा नोकर दीपक सावंत तसेच आणखी काही जणांनाही एनसीबीने अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी