Friendship: बॉलिवूडमधील 'या' मैत्रीची असते नेहमीच चर्चा

Bollywood Celebs Friendship: 30 जुलै रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्ताने जाणून घ्या बी-टाऊनच्या मैत्रीबद्दल...

from salman khan shahrukh khan to sara ali khan janhvi kapoor these friendships are exemplified in bollywood
Friendship: बॉलिवूडमधील 'या' मैत्रीची असते नेहमीच चर्चा  |  फोटो सौजन्य: Instagram

Bollywood celebs friendship: 30 जुलै 2022 रोजी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन (International Friendship Day) साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण आपल्या जवळच्या मित्रांना शुभेच्छा देतो. बी टाऊनही (B-Town) खऱ्या मैत्रीच्या कथा आणि अनेक उदाहरणांनी भरलेला आहे. 

बॉलिवूडमध्ये मैत्रीवर अनेक चित्रपट बनले आहेत आणि भविष्यातही बनत राहतील, पण खऱ्या आयुष्यात अशा अनेक अशा मैत्री आहेत, ज्यावर चित्रपट बनू शकतात. करीना कपूर, करिश्मा कपूर, मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांची मैत्रीही अशीच आहे. 

या मैत्रिणी नेहमी सुख-दु:खात एकत्र असतात. याशिवाय हे चौघेही क्वालिटी टाईमचा मनसोक्त आनंद लुटतात. याशिवाय सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या मैत्रीचे किस्सेही चाहते गेल्या 30 वर्षांपासून ऐकत आहेत. 

बॉलिवूडचे करण-अर्जुन हे मैत्रीचे सर्वात मोठे उदाहरण आहे. बी टाऊनच्या सध्याच्या पिढीबद्दल सांगायचे तर, सुहाना खान, शनाया कपूर, अनन्या पांडे या बालपणीच्या मैत्रिणी आहेत. याशिवाय जान्हवी कपूर आणि सारा अली खानची बॉन्डिंगही चाहत्यांना आवडली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी