Shahrukh Khan on Gauri Khan: शाहरुख खान आणि गौरी खान गेल्या 30 वर्षांपासून सुखी संसार करीत आहेत. दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलतात. शाहरुख खान अलीकडेच एका ब्रँडच्या प्रमोशनसाठी दिल्लीला पोहोचला होता. यावेळी त्याने सांगितले की, घराच्या सजावटीशी संबंधित सर्व निर्णय त्यांची पत्नी गौरी खान घेते. पण, तंत्रज्ञानाचा विचार केला तर त्यासंबंधीचे निर्णय तोच घेतो.
शाहरुख खान म्हणाला की, जेव्हा मी एलईडी टीव्ही घेतो किंवा तो घराच्या कोणत्याही खोलीत किंवा कोपऱ्यात ठेवतो तेव्हा त्याच्याकडून कोणताही प्रश्न विचारला जात नाही.
वर्क फ्रंटवर, शाहरुख खान लवकरच पठाण आणि डंकीमध्ये दिसणार आहे.