Goodluck Jerry New song Mor Mor: अभिनेत्री जान्हवी कपूरच्या गुड लक जेरी या चित्रपटातील मोर मोर हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरप्रमाणेच नवीन गाणेही खूप मनोरंजक आहे. हे गाणे दीदार कौर, गुरलेज अख्तर, विवेक हरिहरन आणि पराग छाबरा यांनी गायले आहे.
जान्हवी कपूरने तिच्या नवीन गाण्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मोर मोर हे गाणे राज शेखर यांनी लिहिले असून पराग छाबरा यांनी संगीत दिले आहे.
जान्हवी कपूरचा नवा चित्रपट 'गुड लक जेरी' 29 जुलै रोजी रिलीज होणार आहे. Disney+ Hotstar वर प्रदर्शित होणारा हा चित्रपट कोलामावू कोकिला (2018) या तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरशिवाय सुशांत सिंह, दीपक डोबरियाल, नीरज सूद, मीता वशिष्ठ हे देखील आहेत.