[VIDEO] गुलाबो-सिताबोचा ट्रेलर रिलीज, बिग बी यांचा भन्नाट लूक 

बी टाऊन
Updated May 26, 2020 | 22:51 IST

Gulabo Sitabo Trailer: अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांच्या गुलाबो-सीताबो या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट थेट १२ जून रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

मुंबई: Gulabo Sitabo Trailer: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा कॉमेडी सिनेमा गुलाबो-सीताबोचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांऐवजी १२ जून रोजी थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केले आहे.

ट्रेलरनुसार चित्रपटाची कथा एक वयस्कर घरमालक आणि भाडेकरूची आहे. या चित्रपटात बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन एका घरमालकाच्या भूमिकेत आहेत. तर त्यांच्या घरात राहण्यासाठी आयुष्मान भाडेकरू म्हणून येतो.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अनेक मजेदार संवाद आणि मजेदार पंच लाईन्स आहेत. यापूर्वी या चित्रपटातील आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट लूक समोर आला होता. विक्की डोनरनंतर शूजित सरकार आणि आयुष्मान खुराना यांचा हा दुसरा चित्रपट आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी