हर हर शंभू भजन कट्टरपंथीय मुस्लिमांना खटकलं; गायिका फरमाणी नाझ आली मौलवींच्या निशाण्यावर

बी टाऊन
भरत जाधव
Updated Aug 01, 2022 | 13:51 IST

माणसांमधील द्वेषता वाढत जात असून आता कलाक्षेत्रावरही कट्टरपंथीय (Radical) लोक धर्म (religion) द्वेष पसरवत आहेत. कलाकारांना (artists) आणि त्यांच्या कलाकृतींना धर्माच्या बेडीत अडकू पाहत असून या धर्मद्वेषाची शिकार ठरलीय इंडियन आयडॉल फेम (Indian Idol fame) फरमानी नाझ (Farmani Naz). गायिका (singer) फरमानी नाझ कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. तिने गायलेला शिव स्तोत्रांमुळे मौलवींना राग आला आहे. फरमानी नाझ यांनी गायलेली भजने हराम असल्याचे बोलले जात आहे. 

Radical upset over Singer Farmani Naz's Shiv Sadhana?
गायिका फरमानी नाझच्या शिवसाधनेवर कट्टरपंथीय नाराज?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • श्रावण महिन्यात फरमाणी नाझचे हर-हर शंभू भजन खूप पसंत केले जात आहे.
  • कट्टरपंथीयांनी त्यांच्या शिव स्तोत्रावर संताप व्यक्त करत याला हराम असल्याचे म्हटले आहे.
  • नाझ म्हणते की ती अदबसोबत गाणी गाते, लोकांना तिचे गाणे आवडतात.

Farmani Naaz Shiv Shambhu Bhajan : माणसांमधील द्वेषता वाढत जात असून आता कलाक्षेत्रावरही कट्टरपंथीय (Radical) लोक धर्म (religion) द्वेष पसरवत आहेत. कलाकारांना (artists) आणि त्यांच्या कलाकृतींना धर्माच्या बेडीत अडकू पाहत असून या धर्मद्वेषाची शिकार ठरलीय इंडियन आयडॉल फेम (Indian Idol fame) फरमानी नाझ (Farmani Naz). गायिका (singer) फरमानी नाझ कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. तिने गायलेला शिव स्तोत्रांमुळे मौलवींना राग आला आहे. फरमानी नाझ यांनी गायलेली भजने हराम असल्याचे बोलले जात आहे. 

मात्र, कट्टरपंथीयांच्या रागाला ती फारसे महत्त्व देत नसल्याचे फरमानीने वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत सांगितलं आहे. टाईम्स नाऊ नवभारतशी खास संवाद साधताना नाझ म्हणाली की कलाकाराला कोणताही धर्म नसतो. ती कव्वाली, भजनासह सर्व प्रकारची गाणी गाते.  मुझफ्फरनगरची राहणारी फरमानी तिची भक्तिगीते यूट्यूबवर अपलोड करते. तिने गायलेलं हर-हर शंभू भजन श्रावण महिन्यात खूप लोकप्रिय झाले आहे परंतु त्यांची लोकप्रियता आणि शिवभजन हे मौलवींना आवडत नाहीये.  दरम्यान, कट्टरवाद्यांनी नाझच्या भजनासाठी फतवा काढला नसून, त्यांनी त्या गाण्याला हराम म्हटले आहे. नाझने इंडियन आयडॉलमध्येही गाणे गायले आहे, परंतु मुलाची तब्येत बिघडल्याने तिला परतावे लागले.

एका मौलवीने सांगितले की इस्लाममध्ये कोणत्याही प्रकारचे नृत्य आणि गाणे गाण्यास परवानगी नाही. इस्लाममध्ये संगीत हराम आहे. मुस्लिमांनी हे टाळावे. फरमानीने गायलेले गाणे हराम आहे, त्यामुळे ते बंद करावे.फरमानीचे म्हणणे आहे की, तिच्या पतीने दुसरे लग्न केले आहे. सासरच्या घरातून हाकलून दिल्यानंतर ती तिच्या माहेरच्या घरी राहते. त्यांच्या मुलाला शारीरिक समस्या आहे.

माहेरी राहून ती गाणी गाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. फरमानी म्हणते की, ती भजने आणि गाणी मोठ्या उत्साहाने गाते. यूट्यूबवर नाझचे लाखो चाहते आहेत. त्याचे 3.33 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ती तिचा भाऊ राहुल बच्चन यांच्यासोबत

यूट्यूबवर बनवते गाणे

फरमानीच्या भजनाला विरोध होताच, भाजपचे नेते मैदानात उतरले आहेत. भाजप प्रदेश कार्यसमिती सदस्य जयवर्धन जोशी म्हणाले की,  'हर हर शंभू' हे प्रसिद्ध शिव भजन गायल्यानंतर फरमानी नाझ यांच्या कुटुंबियांना घराच्या बाहेर काढण्यात आले आहे. इस्लामिक कट्टरतावादी फतवे काढण्याची धमकी देत ​​आहेत. देशाची गंगा-जमुनी तेजजीब आता कुठे गेली, याला देशाची धर्मनिरपेक्षता म्हणायचे का?, असा प्रश्न जोशी यांनी केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी