[VIDEO] हनी सिंगचं नवं गाणं रिलीज, पण चर्चा वजन वाढलेल्या हनीची 

बी टाऊन
Updated Mar 04, 2020 | 16:38 IST

हनी सिंग यांच्या नव्या गाण्याचा व्हिडिओ नुकताच रिलीज झाला आहे. पण या गाण्यापेक्षा हनी सिंगच्या लूकचीच जास्त चर्चा होत आहे.

मुंबई: प्रसिद्ध गायक हनी सिंग याचं नवीन गाणं 'लोका' हे नुकतंच रिलीज झालं आहे. ज्यामध्ये रॅपर आणि गायक त्यांच्या जुन्या स्टाइलमध्ये दिसतो आहे. हे गाणं दुबईतील खास लोकेशन्सवर शूट करण्यात आले आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये हनी सिंग एका बोटीवर  मुलींनी वेढलेला दिसतो आहे. 

या गाण्यात हनी सिंगची जुनी छाप जाणवेल. कारण यात फनी आणि काही चीप शब्दांचा वापर करून रिदम तयार करण्यात आला आहे. हा व्हिडिओ ३ मिनिट ३९ सेकंदाचा आहे. पण आपल्याला आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे हनी सिंगचा लूक. एकेकाळी जबरदस्त बॉडी असलेला आणि फिटिंग कपड्यांमध्ये दिसणारा हनी सिंग या व्हिडिओमध्ये खूप वजनदार दिसतो आहे आणि त्याने सैल कपडेही परिधान केले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी