VIDEO: या वर्षी अनेक हॉरर सिनेमांचा धमाका; अनेक सिनेमा रिलीजसाठी सज्ज

Horror movies: बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आगामी हॉरर सिनेमांची रिलीज डेट शेअर केली आहे. यामध्ये जान्हवी कपूर, अर्जुर कपूर, ईशान खट्टर, सैफ अली खान यांचा समावेश आहे.

horror movies set to release in year 2021
VIDEO: या वर्षी अनेक हॉरर सिनेमांचा धमाका; अनेक सिनेमा रिलीजसाठी सज्ज 

मुंबई : फिल्म इंडस्ट्रीत नेहमीच हॉरर सिनेमांचं एक खास वजन राहिलेलं आहे. हॉरर सिनेमांची क्रेझ प्रेक्षकांमध्ये नेहमीच पहायला मिळते. तर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींची हॉरर सिनेमात काम करण्याची इच्छा असते. आता २०२१ या वर्षात बॉलिवूडमधील अनेक हॉरर सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाले आहेत. यामध्ये जान्हवी कपूर, राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांच्या रूही सिनेमाचा समावेश आहे. हा सिनेमा ११ मार्च रोजी रिलीज होणार आहे. तर दुसरीकडे सैफ अली खान, जॅकलीन फर्नांडिस, अ्जुन कपूर आणि यामी गौतम यांचा भूत पोलीस सिनेमाही रिलीज होण्यासाठी तयार आहेत. हा सिनेमा १० सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. 

रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू हे आपल्या आगामी भूल भुलैय्या २ या सिनेमासाठी एकत्रित काम करत आहेत. हा सिनेमा १९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वैदी आणि ईशान खट्टर यांचा फोन बूथ हा सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी