पती सैफ अली खान घरकामात दंग अन् करीना मित्रांसोबत मजा-मस्तीत गुंग

Kareena Kapoor Khan Enjoying With Alexandra Galligana And Jeh: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खानचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती आपल्या मुलासोबत आणि मित्रांसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. तर सैफ अली खान घरातील कामे करताना दिसत आहे.

husband saif ali khan housework kareena kapoor khan started enjoying with friends
पती सैफ अली खान घरकामात दंग अन् करीना मित्रांसोबत गुंग  |  फोटो सौजन्य: Instagram

Kareena Kapoor Khan Enjoying With Alexandra Galligana And Jeh Ali Khan: अभिनेत्री करीना कपूर-खान तिच्या संपूर्ण कुटुंबासह इंग्लंडमध्ये सुट्टीचा आनंद लुटताना दिसली. अलीकडे करीना कपूर-खान आणि तिचा पती सैफ अली खान यांचे काही फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. 

या फोटोंमध्ये करीना कपूर-खान तिच्या मित्र-मैत्रिणीं आणि मुलगा जेहसोबत खूप एन्जॉय करताना दिसत आहे. तर सैफ अली खान किचनमध्ये जेवण बनवत आहे. करीना कपूर खान आणि सैफ अली खानचे हे फोटो करीनाचा मित्र अलेक्झांडरने शेअर केले आहेत. 

या जोडप्याच्या लंडन टूरची ही नवीन छायाचित्रे आहेत. या फोटोंमध्ये जेह आई करीना कपूर खानसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी