[VIDEO] ...म्हणून मी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसतो: शाहरुख खान

बी टाऊन
Updated Oct 06, 2019 | 21:42 IST

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याने सोशल मीडियाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. तसंच तो सोशल मीडिया जास्त वापरत नसल्याचंही त्याने सांगितलं आहे.

मुंबई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान हा नुकताच आपल्या एका टीव्ही शोच्या लाँचिंग इव्हेंटसाठी आला होता. इथे त्याने मीडियाशी बोलताना सोशल मीडियाच्या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केलं. या दरम्यान, शाहरुखने सांगितलं की, तो सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह नसतो. तो पुढे असंही म्हणाला की, 'मला नाही वाटत की, कोणत्याही मुद्द्यावर मी काही बोलल्याने फार काही फरक पडेल.' यामुळेच शाहरुख दुसऱ्या कोणत्याही मुद्द्यावर फार बोलत नाही. 

आपल्या आगामी सिनेमाबाबत शाहरुख म्हणाला की, तो काही स्क्रिप्टवर काम करत आहे. त्यामुळे जेव्हा स्क्रिप्ट फायनल होईल तेव्हाच सिनेमाबाबत तो स्वत: मीडियामध्ये घोषणा करणार आहे. शाहरुखने शेवटचा सिनेमा 'जीरो' हा केला होता. ज्यामध्ये त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा या देखील होत्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...