'मी तीच मुलगी आहे जी मंदिरात जाते, बिकिनीही घालते', पाहा Sara Ali Khan असं का म्हणाली

सारा अली खान सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करते, कधी मंदिरात जाते तर कधी समुद्राजवळ किंवा पूलमध्ये बिकिनी घालून वावरते. पाहा या सगळ्यावर सारा अली खान नेमकं काय म्हणाली...

i am same girl who goes to temple also wears bikini know why sara ali khan said this
'मी तीच मुलगी आहे जी मंदिरात जाते, बिकिनीही घालते', पाहा Sara Ali Khan असं का म्हणाली  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: अभिनेत्री सारा अली खान हि तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. काहीवेळा ती मंदिरात जातानाचे फोटो शेअर करते. तर कधी-कधी ती समुद्र किनारी किंवा स्विमिंग पूलमधील बिकिनीतले फोटोही शेअर करते. 

यावर आता सारा अली खान म्हणाली, 'मी अजूनही तीच मुलगी आहे जी मंदिरात जाते आणि बीचवर बिकिनीही घालते. माझ्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू मला कळत आहेत. शूटिंगदरम्यान ४५ दिवस आईपासून दूर जाणे मला आवडत नाही.' 

सध्या सारा अली खान ही आता विकी कौशलसोबत लवकरच नव्या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती तिची मैत्रिण जान्हवी कपूरसोबत कॉफी विथ करण सीझन 7 मध्ये सहभागी होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी