Nana Patekar: मला काही झाले तर नाना पाटेकर जबाबदार असेल: तनुश्री दत्ता

Tanushree Dutta Shares A Cryptic Post: MeToo मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेत्री तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा गुप्त पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने म्हटलं आहे की, तिला काही झालं तर त्याला नाना पाटेकर जबाबदार असतील.

if anything happened to me nana patekar will be responsible actress tanushree dutta post
Nana Patekar: मला काही झाले तर नाना पाटेकर जबाबदार असेल: तनुश्री दत्ता  |  फोटो सौजन्य: Instagram

Tanushree Dutta Shares A Cryptic Post: अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या एका इंस्टाग्राम पोस्टने सोशल मीडियावर पुन्हा खळबळ माजली आहे. अलीकडेच, तनुश्रीने अशी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे सर्वांच्या नजरा तिच्या आणि नाना पाटेकरांवर खिळल्या आहेत. 

ही पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने लिहिले आहे की, 'तिला काही झाले तर त्यासाठी नाना पाटेकर, त्यांचे वकील आणि सहकारी तसेच बॉलिवूड माफिया मित्र जबाबदार असतील. 

पुढे, तनुश्रीने असंही लिहलं आहे की, हा तो बॉलिवूड माफिया आहे ज्याचे नाव सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात जोडले गेले आहे. ही पोस्ट शेअर करताना तनुश्रीने लोकांना आवाहन केले आहे की, नाना पाटेकर आणि बॉलीवूड माफियांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी