VIDEO: कॉमेडी सिनेमांना कंटाळला कार्तिक आर्यन... आता 'ही' भूमिका साकारणार! 

चित्रपटांमध्ये आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना हसवल्यानंतर आता कार्तिक आर्यन राम माधवानीच्या चित्रपटात इन्वेस्टिगेटिव्ह पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

kartik aaryan
कार्तिक आर्यन  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करणारा अभिनेता कार्तिक आर्यन आता लवकरच राम माधवानीच्या चित्रपटात दिसणार आहे. बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा आपल्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सज्ज आहे. डिसेंबरमध्ये तो राम माधवानीच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. मात्र अद्याप चित्रपटाचे नाव समोर आलेले नाही. या सिनेमात तो एका इन्वेस्टिगेटिव्ह पत्रकाराची भूमिका साकारताना दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात फक्त ५ ते ६ पात्रांचीच भूमिका असेल.

असे म्हटले जात आहे की, कार्तिक आर्यनने हा चित्रपट साइन केला कारण त्याला आता विनोदी चित्रपटांपेक्षा  काहीतरी वेगळे करायचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी