Jacqueline Fernandez and Michele Morrone: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सुकेशकडून मिळालेल्या महागड्या गिफ्ट, वस्तू मिळाल्यावर ती ईडीच्या जाळ्यात अडकली आहे. त्याच दरम्यान आता जॅकलिनच्या आयुष्यात एका नव्या चेहऱ्याची एन्ट्री झाली आहे. ताज्या माहितीनुसार, जॅकलिन फर्नांडिस सध्या '365 डेज' स्टार मिशेल मोरोन याला डेट करत असल्याचं वृत्त समोर येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री जॅकलिन आणि मिशेल हे एकमेकांसोबत रिलेशनमध्ये असल्याचं बोललं जात आहे. टोनी आणि नेहा कक्कर यांनी गायलेल्या 'मुड मुड के' गाण्यावर दोघांची डान्समध्ये केमेस्ट्री पहायला मिळाली. मात्र, दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाहीये. मिशेल मोरोन एक इटालियन अभिनेता तसेच गायक आणि फॅशन डिझायनर आहे.