Varun Dhawan: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कूपर सध्या आपल्या आगामी बवाल सिनेमाचं शूटिंग करत आहे. पोलंडमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. त्याच दरम्यान वरुण धवन याने जान्हवी कपूरचा एक असा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर सिनेमाच्या टीमसमोर माफी मागताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की, व्हाईट स्वेटशर्ट, ग्रे पँट आणि व्हाईट स्नीकर्समध्ये अभिनेत्री जान्हवी हॉटेल बाहेर येते आणि त्यानंतर आपल्या सिनेमाच्या टीमसमोर माफी मागते. त्याच दरम्यान वरुण धवन संपूर्ण टीमच्या समोर अभिनेत्रीची मस्करी करायला सुरवात करतो.
झालं असं होतं की, अभिनेत्री जान्हवी कपूरला आपल्या सिनेमाच्या शूटिंगसाठी उशीरा पोहोचली होती आणि त्यामुळेच तिला सिनेमाच्या टीमची माफी मागावी लागली होती. उशीरा येण्याच्या कारणामुळे अभिनेता वरुण धवन हा जान्हवीची मस्करी करताना दिसून येत आहे.