[VIDEO] : श्रीदेवीच्या चालबाजच्या रिमेकसाठी जान्हवी कपूरचा नकार

बी टाऊन
Updated Aug 23, 2019 | 19:33 IST | Zoom

जान्हवी कपूरने श्रीदेवीच्या चालबाज चित्रपटाच्या रिमेकमध्ये भूमिका करण्यास नकार दिला आहे. निर्माते डेविड धवन चालबाज चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत.

Janhvi Kapoor
जान्हवी कपूर  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही नेहमीच चर्चेत असते. जान्हवीने सैराटचा रिमेक असलेल्या 'धडक' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. श्रीदेवीचा ‘चालबाज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. निर्माते डेविड धवन 'चालबाज' या चित्रपटाचा रिमेक करणार आहेत. या चित्रपटात श्रीदेवीच्या भूमिकेसाठी  जान्हवी कपूरला विचारलं असता जान्हवीने नकार दिला आहे. कारण भविष्यात श्रीदेवीची आणि तिची तुलना होऊ नये. आता ही भूमिका साकारण्यासाठी अखेर त्यांनी आलिया भट्टची निवड केल्याचं समजतंय.
 
स्वत: बोनी कपूर यांना श्रीदेवीच्या चित्रपटांचा रिमेक करण्याची इच्छा आहे. जान्हवी सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते. तर अनेकदा तिचा पंजाबी ड्रेसमधीलही सोज्वळ लूक चाहत्यांना पाहायला मिळतो. जान्हवीने करण जोहरच्या धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 
  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...