[VIDEO] रितेश देशमुखसाठी जॉन अब्राहमने आपल्या 'पागलपंती' सिनेमाची तारीख पुढे ढकलली?

बी टाऊन
Updated Sep 08, 2019 | 03:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याने आपला आगामी सिनेमा पागलपंतीच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 'मरजावां' या सिनेमासाठी जॉनने हा निर्णय घेतला आहे. 

John Abraham
[VIDEO] जॉनने आपल्या 'पागलपंती' सिनेमाची तारीख पुढे ढकलली?  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याने आपला आगामी सिनेमा पागलपंतीच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. कारण की, पागलपंती हा सिनेमा सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांचा मरजावां यांच्या सिनेमासोबतच प्रदर्शित होणार होता. पण काही दिवसांपूर्वीच जॉनने मरजावां सिनेमाचा ट्रेलर पाहिला होता. तो ट्रेलर जॉनला खूपच आवडला त्यामुळे जॉनने आपल्या सिनेमाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय हा मरजावां सिनेमाचा दिग्दर्शक आणि मित्र निखिल आडवाणीसाठी घेतला. या निर्णयाबाबत जॉनचं असं म्हणणं आहे की, या सिनेमाचा लेखक मिलाप हा खूपच चांगला लेखक आहे. तसंच दिग्दर्शक निखिल देखील खूप चांगला माणूस आहे. त्यामुळे आमची मैत्री महत्त्वाची आहे. दरम्यान, मरजावां सिनेमा ८ नोव्हेंबरला तर पागलपंती सिनेमा २१ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...