बरंच रोमँटिक आहे हे गाणे, पाहा VIDEO 

बी टाऊन
Updated Jun 03, 2020 | 22:28 IST

Jubin Nautiyal Meri Aashiqui Song: आपल्या आवाजाने जादू करणारा जुबिन नौटियाल हा एका रोमाँटिक गाण्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसणार आहे. 

मुंबई: Jubin Nautiyal Meri Aashiqui Song: आतापर्यंत जुबिन नौटियालचा आवाज आपण ऐकला आहे, पण आता तो आपल्याला पडद्यावर झळकताना दिसणार आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या 'मेरी आशिकी' गाण्यात तो दिसणार आहे.  या लोकप्रिय गायकाने अभिनेता म्हणून आता प्रवेश केला आहे. या व्हिडिओत जुबिन लोकप्रिय पंजाबी आणि बॉलिवूड अभिनेत्री इहाना ढिल्लनसोबत दिसत आहे.

हे गाणे रश्मी विराग यांने लिहिले असून व्हिडिओचे दिग्दर्शन आशिष पांडा यांनी केले आहे. गाण्याचे संगीतकार रसिक कोहली आहेत. हे गाणे जीवनाचे सौंदर्य आणि आपल्या प्रियजनांबरोबर घालवलेल्या छोट्या क्षणांची नक्कीच आठवण देईल. पाहा या गाण्याचा व्हिडिओ.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी