Video: 'या' गोष्टीमुळे कबीर सिंग सिनेमा टीकेच्या कचाट्यात

बी टाऊन
Updated Jun 25, 2019 | 18:41 IST

Kabir Singh Movie Critics: गेल्या आठवड्यात शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंग रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलंच कलेक्शन करत आहे. तर दुसरीकडे सिनेमातील कंटेटमुळे सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. 

Shahid Kapoor in Kabir Singh
Video:या गोष्टीमुळे कबीर सिंग सिनेमा टीकेच्या कचाट्यात  |  फोटो सौजन्य: Instagram

बॉलिवूड स्टार शाहिद कपूरचा कबीर सिंग सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी कबीर सिंग सिनेमा रिलीज झाला. त्यानंतर या सिनेमा लोकांच्या पसंतीस उतरला आहे. आतापर्यंत कबीर सिंग या सिनेमानं ८८ कोटी रूपयांची कमाई केली. एकीकडे या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडून काही क्रिटिक्सनी सिनेमाच्या कंटेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

सोशल मीडियावर काही फॅन्सनी या सिनेमात महिलांसाठी शाहिद कपूरची भूमिका ज्या पद्धतीनं दाखवली आहे. त्यावर जोरदार टीका केली जात आहे. लोकांच्या मते, हा सिनेमा कोणत्याही पद्धतीनं मास ऑडियन्ससाठी नाही आहे. हा सिनेमा केवळ महिलांसाठी लहान विचार करणाऱ्यांसाठी बनवला आहे. 

कबीर सिंग या सिनेमासाठी लोकांना त्रास या गोष्टींचा आहे की, कबीर सिंगच्या भूमिकेत कलाकार आपल्या घरकाम करणाऱ्या महिलांला मारण्यासाठी पळतो, महिलांसोबत गैरवर्तन करणं, मुलीच्या परवानगीशिवाय तिला किस करणं, महिलांसाठी छोटे विचार करणे. मात्र शेवटी सिनेमात हॅप्पी एंडिंग दाखवली आहे. कबीर सिंगला त्याच्या वर्तनासाठी कोणतीच शिक्षा मिळत नाही. एवढंच काय तर बॉलिवूड सिंगर सोना मोहापात्रानं ट्विट करून या सिनेमावर टीका केली. 

दुसरीकडे या सिनेमानं अवघ्या ४ दिवसांमध्ये ९० कोटींची कमाई केलीय. हा सिनेमा नवीन रेकॉर्ड बनविण्याच्या तयारीत आहे. पहिल्याच दिवशी २०.२१ कोटींची कमाई ‘कबीर सिंग’नं केली. बॉक्स ऑफिसवरील सिनेमाच्या या यशानंतर शाहिद कपूरच्या करिअरमधील सर्वात जास्त ओपनर हा सिनेमा ठरलाय. यापूर्वी ‘पद्मावत’ सिनेमानं पहिल्या दिवशी १९ कोटींचा गल्ला जमवला होता. ‘कबीर सिंग’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईनंतर हा सिनेमा शाहिद कपूरचा सर्वाधिक कमाई करणारा सोलो ओपनर झालाय. यापूर्वी शाहिदच्या ‘शानदार’ या सिनेमानं पहिल्या दिवशी १३.१० कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला होता. 

शाहिदचा जबरदस्त अभिनय

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरनं आपल्या जबरदस्त अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाद्वारे शाहिदनं दाखवून दिलंय की, तो कोणत्याही प्रकारची भूमिका उत्तमरित्या साकारू शकतो. प्रेक्षकांना डोकं फिरलेला प्रियकर आणि रागीट डॉक्टर खूप आवडला. तर निष्पाप कियाराचा अभिनही प्रेक्षकांची मनं जिंकून गेला. सिनेमात कियाराचे डायलॉग कमी आहेत, पण तिनं आपल्या अभिनयानं भूमिकेला योग्य न्याय दिलाय. क्रिटिक्स सोबतच प्रेक्षकांनाही सिनेमा आवडतोय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Video: 'या' गोष्टीमुळे कबीर सिंग सिनेमा टीकेच्या कचाट्यात Description: Kabir Singh Movie Critics: गेल्या आठवड्यात शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंग रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलंच कलेक्शन करत आहे. तर दुसरीकडे सिनेमातील कंटेटमुळे सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola