शाहिद कपूरचा भयानक अवतार, कबीर सिंगचा ट्रेलर रिलीज

बी टाऊन
Updated May 14, 2019 | 14:50 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

कबीर सिंग २१ जूनला रिलीज होणार आहे. या सिनेमात शाहिद कपूर अशा डॉक्टरची भूमिका साकारत आहेत. ज्याला ब्रेकअपनंतर दारूचं व्यसन लागतं. कबीर सिंह साऊथचा सिनेमा अर्जुन रेड्डीचा रिमेक आहे.

Kabir Singh
शाहिद कपूरचा भयानक अवतार, कबीर सिंगचा ट्रेलर रिलीज  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबईः शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंगचा ट्रेलर रिलीज झाला आहे. कबीर सिंग साऊथचा सिनेमा अर्जुन रेड्डीचा रिमेक आहे. अर्जुन रेड्डीमध्ये विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत होता. सिनेमात शाहिदच्या अपोजिटला कियारा अडवाणी आहे.  कबीर सिंग हा सिनेमा २१ जूनला रिलीज होणार आहे.  या सिनेमात शाहिद कपूर अशा डॉक्टरची भूमिका साकारत आहेत. ज्याला ब्रेकअपनंतर दारूचं व्यसन लागतं. 

सिनेमाची कथा एक मेडिकल स्टुडंटची आहे. जो नंतर डॉक्टर बनतो. ब्रेकअपनंतर त्याला दारूचं व्यसन लागतं. याव्यतिरिक्त तो खूप रागीठ होतो. सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटच्या दरम्यान शाहिदनं सांगितलं की, रिअल लाईफमध्ये ब्रेकअपनंतर शाहिदची परिस्थिती कशी झाली होती. 

तारा सुतारियाला ऑफर केला होता हा रोल

कियाराची भूमिका पहिली स्टुडंट ऑफ द ईयर- २ एक्ट्रेस तारा सुतारिया प्ले करणार होती. मात्र त्यानंतर तिनं हा सिनेमा सोडला आणि करण जोहरचं प्रोडक्शन हाऊस धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेला SOTY 2 हा सिनेमा निवडला. तारा सुतारियाचा हा सिनेमा हल्लीच रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. 

कबीर सिंगच्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूर हेवी बियर्ड लूकमध्ये दिसला. यात सुद्धा टिझरप्रमाणे अपशब्द, दारू आणि ड्रग्स दाखवण्यात आले आहेत. ट्रेलरमध्ये कियारा देखील दिसतेय. हा सिनेमा अर्जुन रेड्डीचा डायरेक्टर संदीप वांगा यांनी डायरेक्ट केला आहे. 

या सिनेमाचा टीझर ८ एप्रिलला लॉन्च करण्यात आला. टीझरवरून असं समजले की, हा धमाकेदार अॅक्शनपट सिनेमा असेल. शाहिद कपूर या सिनेमात दिल्लीच्या मुलाची भूमिका निभावत आहे. हा मुलगा अभ्यासात हुशार आहे. याशिवाय टीझर पाहिल्यानंतर हे लक्षात येते की या मुलाला दारूचे व्यसन आहे अथवा एखाद्या कारणामुळे त्याची ही स्थिती झाली आहे.

याआधी शाहिद कपूरनं संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमातील राज रावल रतन सिंह यांची दमदार भूमिका साकारली. उडता पंजाब या सिनेमानंतर शाहीद कपूर पुन्हा ग्रे शेडमध्ये दिसणार आहे. शाहिदने या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. 

तसंच पहिल्यांदा शाहिद आणि कियारा मोठ्या स्क्रीनवर दिसत आहेत. कियाराने 'लस्ट स्टोरीज' आणि 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' आणि तेलुगुमध्ये 'भारत आने नेनू' या सिनेमांमध्ये काम केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
शाहिद कपूरचा भयानक अवतार, कबीर सिंगचा ट्रेलर रिलीज Description: कबीर सिंग २१ जूनला रिलीज होणार आहे. या सिनेमात शाहिद कपूर अशा डॉक्टरची भूमिका साकारत आहेत. ज्याला ब्रेकअपनंतर दारूचं व्यसन लागतं. कबीर सिंह साऊथचा सिनेमा अर्जुन रेड्डीचा रिमेक आहे.
Loading...
Loading...
Loading...