‘कलंक’मधील भूमिकेवरून पाहा सोनाक्षी का आहे नाराज

बी टाऊन
Updated Apr 16, 2019 | 16:10 IST | टाइम्स नाऊ हिंदी

कलंकच्या प्रमोशन दरम्यान जेव्हा सोनाक्षी सिन्हाला विचारण्यात आलं की शूटिंग दरम्यान तुझा अनुभव कसा राहिला? तेव्हा सोनाक्षीनं जखमेवर मीठ चोळू नका, असं म्हटलं. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...

kalank poster
कलंक चित्रपटामुळे का आहे सोनाक्षी नाराज  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: बॉलिवूडच्या धक-धक गर्लच्या म्हणजे माधुरी दीक्षितच्या डांसचे सर्व जण फॅन आहेत. माधुरीच्या अदा, तिचे एक्सप्रेशन्स आणि तिची मोहक अदा सर्वात वेगळी आहे. हेच कारण आहे की, बॉलिवूडच्या सर्व अभिनेत्रींना माधुरी सोबत काम करण्याची इच्छा असते. एव्हढंच नाही तर बॉलिवूडच्या अनेक नवोदित अभिनेत्री माधुरीला आपलं आयडियल मानतात आणि तिच्यासोबत काम करू इच्छितात. आता सोनाक्षी सिन्हालाच घ्या... सोनाक्षी माधुरीची जबरदस्त फॅन आहे आणि आगामी ‘कलंक’ चित्रपटात तिच्यासोबत काम ही करत आहे. मात्र सोनाक्षी ही फिल्म केल्यानंतर आनंदी नाहीय, कारण त्यात तिची एक इच्छा पूर्ण झाली नाही.

‘कलंक’च्या प्रमोशनमध्ये जेव्हा सोनाक्षीला विचारलं गेलं की चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिचा अनुभव कसा होता, तर सोनाक्षीनं म्हटलं की माझ्या जखमेवर मीठ चोळू नका. कारण सोनाक्षीला यात माधुरी सोबत डांस करण्याची संधी मिळाली नाही. तसंच आलिया भट्टच्या रोलमुळे आलियाला डांसची संधी मिळाली पण तिला नाही. त्यामुळं तीनं आपली नाराजी व्यक्त केली. मात्र माधुरी दीक्षित सोबत स्क्रीन शेअर केल्याचा तिला आनंद आहे, असंही ती म्हणाली.

‘कलंक’ हा चित्रपट एक मल्टीस्टारर चित्रपट आहे. यात सोनाक्षी-माधुरी सोबत आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त हे सुद्धा आहेत. याच इंटरव्ह्यू मध्ये आलिया भट्ट म्हणाली, माधुरी दीक्षित सोबत काम करण्याचा आणि डांस करण्याचा तिचा अनुभव खूप चांगला होता. जेव्हा शूटिंग दरम्यान, आलिया नर्व्हस व्हायची तेव्हा माधुरी तिला स्माईल करवत होती आणि तिला आनंदी राहण्यास सांगत होती. आलिया पुढे म्हणाली, माधुरी दीक्षित सोबत काम केल्यानं तिला खूप काही शिकायला मिळालं.

सोनाक्षी सिन्हा सध्या खूप कमी चित्रपटांमध्ये दिसतेय. सोनाक्षीला तशी संधी सध्या मिळताना दिसत नाहीय. ‘कलंक’ चित्रपटात मुख्य भूमिका आलियाला देण्यात आल्यानं सोनाक्षीचा रोल थोडा कमी असल्याचं तिला वाटतं. त्यामुळं ती नाराज असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये आहे. तर आलिया भट्ट ‘कलंक’ सोबतच लवकरच रणबीर कपूरसोबत ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
‘कलंक’मधील भूमिकेवरून पाहा सोनाक्षी का आहे नाराज Description: कलंकच्या प्रमोशन दरम्यान जेव्हा सोनाक्षी सिन्हाला विचारण्यात आलं की शूटिंग दरम्यान तुझा अनुभव कसा राहिला? तेव्हा सोनाक्षीनं जखमेवर मीठ चोळू नका, असं म्हटलं. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...
Loading...
Loading...
Loading...