Times Now Summit 2021: पद्मश्री, लग्नापासून वेगवेगळ्या विषयांवर 'हे' बोलली कंगना

Kangana Ranaut in Times Now Summit Global Influence of Bollywood टाइम्स नाउ समिट २०२१ मध्ये बातचीत करताना कंगना नुकत्याच मिळालेल्या पद्म पुरस्काराविषयी तसेच अभिनय क्षेत्रातील प्रवासाविषयी आणि बॉलिवूडविषयी बेधडकपणे बोलली.

Kangana Ranaut in Times Now Summit Global Influence of Bollywood
पद्मश्री, लग्नापासून वेगवेगळ्या विषयांवर 'हे' बोलली कंगना 
थोडं पण कामाचं
  • पद्मश्री, लग्नापासून वेगवेगळ्या विषयांवर 'हे' बोलली कंगना
  • पद्म पुरस्काराविषयी तसेच अभिनय क्षेत्रातील प्रवासाविषयी आणि बॉलिवूडविषयी बेधडकपणे बोलली
  • नेपोटिझमवर कंगनाने तिची मतं मोकळेपणाने व्यक्त केली

Kangana Ranaut in Times Now Summit Global Influence of Bollywood । मुंबई: भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रतिष्ठीत टाइम्स नाउ समिट २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. या समिटमध्ये सेलिब्रेटिंग इंडिया @75 आणि शेपिंग इंडिया @100 थीमच्या आधारे सुरू असलेल्या कार्यक्रमात आज कंगना रनौत आली. बॉलिवूडची जगात नवी ओळख निर्माण करणारी आणि बेधडक बोलणारी अशी कंगनाची ओळख आहे. टाइम्स नाउ समिट २०२१ मध्ये टाइम्स नेटवर्कच्या ग्रुप एडिटर आणि टाइम्स नाउ नवभारतच्या एडिटर इन चीफ नाविका कुमार यांनी कंगना रणौतशी बातचीत केली.

बातचीत करताना कंगना नुकत्याच मिळालेल्या पद्म पुरस्काराविषयी तसेच अभिनय क्षेत्रातील प्रवासाविषयी आणि बॉलिवूडविषयी बेधडकपणे बोलली. बॉलिवूडमध्ये विशिष्ट व्यक्तींना महत्त्व देण्याचा जो प्रकार सुरू आहे त्या नेपोटिझमवर कंगनाने तिची मतं मोकळेपणाने व्यक्त केली.

कंगनाने ज्या करण जोहरवर अनेकदा टीका केली आहे त्यालाही पद्म पुरस्कार मिळाला. याबाबतचे मत कंगनाने जाहीरपणे व्यक्त केले. कंगना समिटच्या निमित्ताने करण आला आहे का हे जाणून घेण्यासही उत्सुक दिसली. ट्विटरने काही महिन्यांपूर्वी कंगनाचे हँडल ब्लॉक केले. या संदर्भात बोलताना नफा कमावण्यासाठी सुरू झालेली कंपनी जर मला ब्लॉक करणार असेल तर मला काही फरक पडत नाही, असे कंगना म्हणाली. 

कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करत असलेल्या भारत सरकारच्या कामगिरीचे जाहीर कौतुक केले. मोदी सरकारच्या कामगिरीमुळे देशवासियांना देशाविषयी प्रचंड अभिमान वाटू लागला असल्याचे कंगना म्हणाली. खासगी जीवनाबाबतही कंगना मोकळेपणाने बोलली. पुढील पाच वर्षांत लग्न करुन आई होण्याची इच्छा असल्याचे कंगना म्हणाली. या विषयावर लवकरच सविस्तर बोलेन, असेही कंगनाने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी