[VIDEO] प्रेग्नंसीमध्येही करीना कपूर आणि अनुष्का शर्माचा स्टायलिश अंदाज 

बी टाऊन
रोहित गोळे
Updated Oct 28, 2020 | 20:22 IST

Kareena Kapoor and Anushka Sharma Pregnant: दोन्ही बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि करीना कपूर आपल्या स्टाईलमध्ये प्रेग्नसीचा आनंद लुटताना दिसत आहे.

anushka sharma
[VIDEO] प्रेग्नंसीमध्येही करीना कपूर आणि अनुष्का शर्माचा स्टायलिश अंदाज   |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: सध्या अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि करीना कपूर या दोघांच्याही चेहऱ्यावर प्रेग्नन्सीचा ग्लो स्पष्टपणे दिसत आहे. दोन्ही अभिनेत्री आपल्या फॅशन, स्टाईल आणि सौंदर्याने आपल्या प्रेग्नन्सीचा आनंद घेत आहेत. करीना कपूर २०२१ मध्ये दुसऱ्यांदा आई बनणार आहे. तर अनुष्का शर्मा ही तिच्या पहिल्या प्रेग्नन्सीचा काळ एन्जॉय करताना दिसत आहे. 

सध्या अनुष्का विराट कोहलीसमवेत दुबईत आहे. अलीकडेच टीम आरसीबीसोबत चिअर करताना अनुष्का शर्माचा फोटो समोर आला होता. यात ती रेड ड्रेसमध्ये बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. 

दुसरीकडे करीना कपूरसुद्धा दुसऱ्यांदा आई होणार आहे. पण तिनेही कामापासून अद्याप ब्रेक घेतलेला नाही. दरम्यान, तिने नुकताच तिच्या आगामी सिनेमा लालसिंग चड्ढा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं आहे. यादरम्यान करीनाने सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर केले असून त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. दोन्ही अभिनेत्रींनी हे सिद्ध केले आहे की गर्भधारणेचा काळ देखील स्टाईलिश पद्धतीने जगू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी