मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे आणि बेबो करिनाचे बेबी बंप असलेले फोटोजही सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच करिनाचे गरोदरपणात योगा करतानाचा फोटो सुद्धा समोर आला होता. याच दरम्यान करिनाच्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे की, करिना मुलाला जन्म देणार की मुलीला? अनेक चाहत्यांनी अंदाज वर्तवला आहे की, तैमूरला बहिण मिळणार आहे.
दरम्यान, एका ज्योतिषीने सुद्धा भविष्यवाणी केली आहे की, करिना मुलीला जन्म देईल. काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या संदर्भात अशीच भविष्यवाणी केल्याचं समोर आलं होतं. दोघे एका मुलीला जन्म देतील असं म्हटलं होतं आणि प्रत्यक्षातही तसेच झाले. त्यामुळे आता ज्योतिषीने केलेल्या या भविष्यवाणीचीही चर्चा जोरदार होत आहे.