Neetu kapoor and Kareena Kapoor team up for New project: मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर तिच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. अभिनेत्री करीना ही नीतू कपूरसोबत एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करताना खूप उत्साही दिसत आहे. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर करीना कपूरने अभिनेत्री नीतू कपूरसोबत नुकत्याच झालेल्या शूटिंगमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. (kareena kapoor was seen enjoying feast will soon be seen in a new project with aunt neetu kapoor)
पहिल्या फोटोमध्ये काकी-पुतणी जोडी सेल्फी घेताना दिसत आहे. फोटोंमध्ये, करीना कपूर कुर्ती परिधान केलेली दिसत आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री नीतू कपूर हिरव्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. सेल्फी शेअर करताना करिनाने लिहिले, 'जेव्हा तुम्ही कुटुंबासोबत शूट करता... नीतू कपूर... मूळ शॉटपेक्षा हा शॉट महत्त्वाचा आहे…'