[VIDEO] 'पती, पत्नी और वो' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी, कार्तिकने केलं असं काही...

बी टाऊन
Updated Nov 21, 2019 | 19:13 IST

अभिनेता कार्तिक आर्यनचा 'दोस्ताना २' हा अपकमिंग सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु 'पती, पत्नी और वो' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी, त्यानं दोस्ताना २ ची शूटिंग अर्धवट सोडली आहे.

थोडं पण कामाचं

  • अभिनेता कार्तिक आर्यनचा अपकमिंग सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
  • पती, पत्नी और वो या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी तो मुंबईला रवाना झाल्याचं समजतं आहे.
  • पानिपत आणि पती,पत्नी और वो हे दोन्ही सिनेमा आमनेसामने येणार आहेत.

मुंबई : बॉलिवूडमध्ये रोमँटिक भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता कार्तिक आर्यनचा अपकमिंग सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं नाव 'दोस्ताना २' आहे. तरूण मनसुखानी दिग्दर्शित दोस्ताना २ या सिनेमाचे शूटिंग सुरू करण्यात आले होते. मात्र दिल्लीतील घातक प्रदूषणामुळे या सिनेमाची शूटिंग रद्द करण्यात आले होते. त्यानंतर या सिनेमाची शूटिंग चंडीगढला करण्यात आले. मात्र आता 'पती, पत्नी और वो' या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी, अभिनेता कार्तिकला दोस्ताना २ ची शूटिंग अर्धवट सोडावे लागले आहे. त्यानंतर पती, पत्नी और वो या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी तो मुंबईला रवाना झाल्याचं समजतं आहे.

 

 

२०१० मध्ये 'दोस्ताना' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात अभिनेता अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम आणि अभिनेत्री प्रियंका चोपडा या तिघांनी भरपूर धमाल केली होती. त्यामुळे या सिनेमाला त्यांच्या चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. तसंच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. 'दोस्ताना २' हा सिनेमा पहिल्या सिनेमाचा दुसरा भाग आहे आणि अभिनेता कार्तिक आर्यन व्यतिरिक्त अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता लक्ष्य या सिनेमात दिसणार आहेत. त्यामुळे या सिनेमाला सुद्धा त्यांच्या चाहत्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळेल, असा अंदाज आहे.

 

 

 कार्तिक आर्यनचा 'पती,पत्नी और वो' हा सिनेमा अपकमिंग महिन्यात रिलीज होणार आहे. त्यामुळे कार्तिकला या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी मुंबईला बोलावण्यात आलं आहे. या सिनेमात कार्तिक आर्यनच्या जोडीला अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे दिसणार आहे. तसंच पुढील महिन्यात पानिपत आणि पती,पत्नी और वो हे दोन्ही सिनेमा आमनेसामने येणार आहेत. हे दोन्ही सिनेमा ६ डिसेंबर २०१९ रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहेत. त्यामुळे कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड धमाल करेल ? हे आपल्याला पाहावं लागणार आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी