Is Katrina Kaif Upset With Hubby Vicky Kaushal:बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिचा पती विकी कौशलवर नाराज आहे. असे म्हटले जात आहे की, विक्की कौशलची तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबतची जवळीक वाढत आहे. ज्यामुळे ती खूप नाराज आहे.
वृत्तानुसार, जेव्हा कतरिना कैफला कळले की रणबीर कपूर विकी कौशलच्या गोविंदा नाम मेरामध्ये छोटी भूमिका साकारत आहे तेव्हा कतरिना अधिकच संतापली.
तिच्या पतीच्या चित्रपटात रणबीर काम करत असल्याने कतरिना खूपच नाराज झाली आहे. रणबीर कपूरने या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे शूटिंग पूर्ण केल्याचे बोलले जात आहे. मात्र, रणबीर कपूर, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी या मुद्द्यावर अद्याप काहीही भाष्य केलेलं नाही.