Khuda Haafiz 2 चं नवं गाणं Aaja Ve रिलीज, वेदनांनी भरलेलं हे गाणं तुम्हाला रडवेल

बी टाऊन
Updated Jun 29, 2022 | 21:51 IST

Khuda Haafiz 2: या सिनेमात विद्युत जामवाल आणि शिवलीका ओबेरॉय आणि फारूक कबीर यांची भूमिका आहे. हा सिनेमा 08 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

थोडं पण कामाचं
  • OTT वर खुदा हाफिजला प्रचंड यश मिळालं.
  • आता खुदा हाफिज चॅप्टर 2 अग्निपरीक्षा घेऊन आले आहेत.
  • हा सिनेमा 08 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

मुंबई: Khuda Haafiz 2 song Aaja Ve: OTT वर खुदा हाफिजला प्रचंड यश मिळालं. त्यानंतर निर्मात्यांनी आता खुदा हाफिज चॅप्टर 2 अग्निपरीक्षा घेऊन आले आहेत. या सिनेमात विद्युत जामवाल आणि शिवलीका ओबेरॉय आणि फारूक कबीर यांची भूमिका आहे. हा सिनेमा 08 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधी त्याचे आजा वे हे गाणे प्रेक्षकांसमोर आलं आहे. आज हे गाणं रिलीज झालं आहे. 

प्रेम आणि ब्रेकअपच्या वेदना दाखवणारे हे गाणे विशाल मिश्रानं गायलं आहे. तर त्याचे बोल फारुख कबीर, विशाल मिश्रा आणि कौशल यांनी लिहिले आहेत. पावसाच्या दृश्यांसह हा एक हार्टटचिंग ट्रॅक आहे.

गाण्याबद्दल फारुख कबीर सांगतात की, मेलोडी शब्दांपेक्षा अधिक वर्णन करू शकते. विशाल मिश्रा यांनी समीर आणि नर्गिस यांच्या प्रेमकथेची भावनिक रचना अतिशय सुंदर पद्धतीने मांडण्यासाठी संगीताच्या ताकदीचा उपयोग केला आहे. 'आजा वे' मध्ये प्रेमाची कसोटी आणि वियोगाच्या वेदनांची अनुभूती दाखवण्यात आली आहे. या सिनेमात विद्युत जामवाल आणि शिवालिका ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी