कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्राचं खरंच ब्रेकअप झालं होतं?, ब्रेकअपच्या अफवांवर अभिनेत्रीनं सोडलं मौन

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Jul 01, 2022 | 20:24 IST

ऑनस्क्रीन असो की ऑफस्क्रीन लोकांना अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची केमिस्ट्री आवडते.

Kiara Advani and Sidharth Malhotra
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राची केमिस्ट्री आवडते.
  • हे दोन बॉलिवूड सेलिब्रिटी एकमेकांना डेट करत आहेत.
  • दोघांमधील सर्व अडचणी दूर झाल्याचा लोकांचा विश्वास वाटू लागला आहे.

Kiara Advani On Break Up Rumours With Sidharth Malhotra: ऑनस्क्रीन असो की ऑफस्क्रीन लोकांना अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची केमिस्ट्री आवडते. रिपोर्ट्सनुसार, हे दोन बॉलिवूड सेलिब्रिटी एकमेकांना डेट करत आहेत पण काही दिवसांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाल्याचं बोललं जात होतं. मात्र, या बातम्यांनंतर सिद्धार्थ आणि कियारा अनेकदा एकत्र दिसले. त्यामुळे या दोघांमधील सर्व अडचणी दूर झाल्याचा लोकांचा विश्वास वाटू लागला आहे. 

अलीकडे, जेव्हा कियाराला ब्रेकअपच्या बातम्यांबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने उत्तर दिले की, 'मला याबद्दल काहीही बोलायचे नाही. मी काही बोलत नसतानाही लोक लिहित आहेत. म्हणूनच मी काय बोलल्यावर लोकं काय लिहितील हे मला माहित नाही. मला वाटेल तेव्हा नक्की बोलेन. सध्या मी माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात खूप आनंदी आहे.

अधिक वाचा-  भाजपचा आणखी एक धक्का! शिंदे सरकार नवा निर्णय घेणार अन् मविआला झटका देणार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी