लाल सिंह चड्ढा सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी पोहोचले दीपिका-रणवीर, सैफ-करिना, पाहा VIDEO

Laal Singh Chaddha movie screening video: 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाचं मुंबईत एक खास स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. 

laal singh chaddha screening many celebrities attend watch video entertainment news in marathi
लाल सिंह चड्ढा सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी पोहोचले दीपिका-रणवीर, सैफ-करिना, पाहा VIDEO 

Laal Singh Chaddha Screening: अभिनेता आमिर खान आणि करिना कपूर यांचा सिनेमा 'लाल सिंह चड्ढा' ११ ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या रिलीजच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी (१० ऑगस्ट) रोजी मुंबईत सिनेमाचं एक स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगसाठी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.

या स्क्रिनिंगसाठी आमिर खान आपली एक्स पत्नी किरण राव आणि मुलगा जुनैद यांच्यासोबत पोहोचला. तर करिना कपूर आपला पती सैफ अली खानसोबत दिसून आली. यासोबतच सिनेमात काम केलेला दक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य, अतुल कुलकर्णी, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह यांच्यासह इतरही सेलेब्स उपस्थित होते. १८० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा सिनेमा ४०० स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी