[VIDEO]: लाल सिंग चड्ढा सिनेमासाठी 'हे' तीन खान एकत्र?

बी टाऊन
Updated Nov 05, 2019 | 22:58 IST

आमिर, सलमान आणि शाहरूख या ३ खानचं एकाच सिनेमात दिसणं म्हणजे सिनेमात धमाल उडवणं असं आहे. लाल सिंग चड्ढा या आगामी सिनेमातून हे तिन्ही खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

मुंबई: मागील दोन दशकांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करणारे तीन खान आगामी सिनेमांत दिसणार आहेत. सुपरस्टार शाहरूख, सलमान आणि आमिर यांचे चाहते संपूर्ण देशभरात आहेत. त्यामुळे त्यांच्या अभिनयाला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत असतो. या ३ खानचा आगामी सिनेमा लाल सिंग चड्ढा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता आमिर खानने आपल्या आगामी सिनेमासाठी या दोन्ही खानला अप्रोच केलं आहे. शाहरूख आणि सलमानला कैमियोच्या भूमिकेसाठी अप्रोच केलं आहे. शाहरूख या सिनेमासाठी तयार झाला आहे. मात्र सलमानकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाहीये. जर तिन्ही खान एकत्र स्क्रिनवर आले तर त्यांच्या चाहत्यांसाठी एक अविस्मरणीय दिवस ठरेल. आतापर्यंत या तिन्ही खानने एकत्र सिनेमात काम केलेले नाहीये. पण या सिनेमाच्या माध्यमातून शक्य होईल की नाही? याची चाहत्यांना वाट बघावी लागणार आहे.

अद्वैत चंदन दिग्दर्शित लाल सिंग चड्ढा या सिनेमाची शूटींग काही दिवसांपूर्वीच सुरू झाली. ३ खान व्यतिरिक्त अभिनेत्री करिना कपूर या सिनेमांत दिसणार आहे. तसेच हा सिनेमा आगामी वर्षांत २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी