मुंबई: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पहिल्यांदाच अभिनेत्री आथिया शेट्टीसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मोतीचूर चकनाचूर या सिनेमात हे दोघेही दिसणार आहेत. सध्या त्यांचा हा सिनेमा खूपच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यांच्या हा ट्रेलर प्रेक्षकांना देखील खूपच आवडला आहे. आता या सिनेमाचं गाणं 'क्रेजी लगदी' देखील रिलीज झालं आहे. या गाण्यात नवाजुद्दीन, आथियाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. हे गाणं स्वरुप खान याने गायलं आहे. या गाण्यात नवाजुद्दीन आणि आथिया हे दोघंही अगदीच फनी अंदाजात दिसत आहेत. जे ट्रेलरमध्येही दिसून आलं. मोतीचूर चकनाचूर हा सिनेमा १५ नोव्हेंबर २०१९ ला रिलीज होणार आहे.