मलायका आणि अर्जुन कपूने पोस्ट केलेला फोटो सोशल मीडियात होतोय व्हायरल; जाणून घ्या कारण...

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी सोशल मीडियात शेअर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो एकच असून सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

Malaika Arora Arjun Kapoor shares photo of youth commuter worshiping Mumbai local train
मलायका आणि अर्जुन कपूने पोस्ट केलेला फोटो सोशल मीडियात होतोय व्हायरल; जाणून घ्या कारण... 

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असतात. या दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला असून तो जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकता की, तब्बल ११ महिन्यांनी पुन्हा सर्वसामान्यांसाठी रुळावर आलेली मुंबईची लोकल ट्रेन पाहून प्रवाशांना खूपच आनंद झाला आहे. या फोटोत एक व्यक्ती लोकलसमोर नतमस्तक होत त्याने आपले डोके टेकवले आहे. हा फोटो खूपच भावूक करत आहे.

कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला आणि त्यासोबतच मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनलाही ब्रेक लागला होता. यामुळे मुंबईकरांना वर्क फ्रॉम होम करावे लागले आणि त्यानंतर अनलॉक झाल्यावर आपले कार्यालय गाठण्यासाठी तासंतास गाडीतून प्रवास करावा लागला. मात्र, आता लोकल ट्रेन सुरू झाल्याने मुंबईकर खूपच सुखावला असून लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनसमोर नतमस्तक झाला आहे. 

हा फोटो सोशल मीडियात भलताच व्हायरल होत असून त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि त्यासोबतच अनेकजण हा फोटो शेअरही करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी