Marjaavaan Song Ek Toh Kum Zindagani: 'ही' अभिनेत्री रेखाच्या रिमिक्स गाण्यावर थिरकली 

बी टाऊन
Updated Oct 10, 2019 | 18:13 IST

Marjaavaan Song Ek Toh Kum Zindagani: अभिनेत्री नोरा फतेही पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपला जलवा दाखवण्यास सज्ज झाली आहे. तिच्या नव्या गाण्याचा व्हिडिओ नुकताच प्रदर्शित झालं आहे. 

मुंबई: सिद्धार्थ मल्होत्रा याचा मरजावां हा सिनेमा सध्या बराच चर्चेत आहे. पण आता या सिनेमाचं एका गाणं सोशल मीडियावर खूप जास्ता चर्चेत आलं आहे. कारण या सिनेमात अभिनेत्री नोरा फतेही भन्नाट थिरकली आहे. ती अभिनेत्री रेखाचं हिट गाणं एक तो कम जिंदगानीच्या रिमिक्सवर थिरकताना दिसते आहे. हे गाणं रिलीज झालं असून त्यामध्ये नोराने जबरदस्त डान्स केला आहे. 

मरजावां सिनेमाचा दिग्दर्शक मिलापच्या सत्यमेव जयते या सिनेमात नोरा दिलबर गाण्यावर थिरकताना दिसली होती. या गाण्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती. पण आता नव्या गाण्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हे गाणं तनिष्क बागचीन रिमिक्स केलं असून नेहा कक्कडने तिला आवाज दिला आहे.या सिनेमात तारा सुतारिया एका खास रोलमध्ये दिसणार आहे. तर रितेश देशमुख विलनच्या भूमिकेत असणार आहे. तसं पाहता आता लवकरच हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. १५ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी