[VIDEO] मौनी रॉयचं होळी साँग रिलीज, नुस्ता दंगा

बी टाऊन
Updated Mar 03, 2020 | 16:25 IST

Mika Singh Mouni Roy New Song Holi Mein Rangeele:  मौनी रॉय आणि मिका सिंह यांचे नवीन गाणे रिलीज झाले आहे. आतापर्यंत हे गाणे २७ लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

मुंबई: टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयचा नवीन म्यूझिक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. मौनीच्या या गाण्याचे नाव 'होली में रंगीले' आहे. या गाण्यात मौनी रॉयने सोनू की टीटूच्या स्वीटी फेम सनी सिंग आणि फुकरे फेम अभिनेता वरुण शर्मा यांच्यासह प्रथमच स्क्रीन शेअर केली आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये या तिघांनीही जबरदस्त डान्स केला आहे. 

हे नवीन गाणं गाण्याचे दिग्दर्शन कोरिओग्राफर-फिल्ममेकर रेमो डिसूझा यांनी केले आहे. तसेच होळीचं हे भन्नाट गाणं प्रसिद्ध पार्श्वगायक मिका सिंह, पल्लवी पुनियानी आणि अभिनव सिंह यांनी गायलं आहे. आतापर्यंत हे गाणे २७ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी