[VIDEO]: जाणून घ्या अभिनेता मिलिंद सोमण यांच्या फिटनेसचं सीक्रेट

बी टाऊन
Updated Aug 17, 2019 | 21:14 IST | Zoom

बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण यांनी Zoom टीव्हीला एक खास मुलाखत दिली. या दरम्यान, त्यांनी वयातील या टप्प्यातही स्वत:ला इतकं फिट कसं ठेवलं. या बद्दल काही फिटनेस सीक्रेट्स सांगितले आहेत.

 Milind soman fitness secrets
अभिनेता मिलिंद सोमण   |  फोटो सौजन्य: Times Now

मुबंई: प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेते मिलिंद सोमण फिटनेसची खूप काळजी घेतात. मिलिंद सोमण बर्‍याचदा आपल्या फिटनेस व्हिडिओ आणि फोटोंमुळे चर्चेत असतात. अलीकडेच मिलिंद सोमण यांनी झूम टीव्हीसोबत बोलताना विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उघडपणे दिलखुलास उत्तरं दिली. मिलिंद म्हणाले की, वयाच्या या टप्प्यावरही माझा उत्साह संपलेला नाही. मी आयुष्यात कधीही जिममध्ये गेलो नाही. त्याने सांगितले की धावणे हे फिट राहण्याचे रहस्य आहे आणि मी मनोरंजनासाठी धावतो. माझं कोणतही रुटीन ठरलेलं नसतं. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी धावण्यासाठी घरा बाहेर पडतो.

मिलिंद सोमण वयाच्या ९ व्या वर्षी राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे विजेते झाले होते. मिलिंद यांनी २०१८ मध्ये आपल्यापेक्षा २७ वर्षांनी लहान असलेल्या अंकिताशी लग्न केलं. मोठ्या वयाचे अंतर असल्यामुळे दोघांचे लग्न खूप चर्चेत आलं होत. मिलिंद सोमण यांचं वय ५३ वर्ष आहे तर अंकिता फक्त २७ वर्षांची आहे, मात्र दोघांमधील केमेस्ट्री पाहण्यासारखी आहे. दोघं नेहमी सोशल मीडियावर आपले रोमँन्टिक फोटो शेअर करत असतात. मिलिंद यांच्याप्रमाणे अंकिताही फिटनेस प्रेमी असून सोशल मीडियावर हे कपल खूप सक्रीय असल्याचं दिसून येतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...